खारेपाटण हायस्कूल येथे महापरिनिर्वाण दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न.म. विद्यालय खारेपाटण येथे भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दीन कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे संतोष पाटणकर व खारेपाटण शिक्षण संस्थेचे संचालक आणि वरिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला खारेपाटण हायस्कूलचे पर्यवेशक संतोष राऊत,शिक्षक राजेश वारंगे,रोहिदास शिंदे,रामदास भिसे, लक्ष्मीकांत हरयाण,श्री जाधव, श्री पाडवी,श्री.गिरी ,गुरव सर सिनियर कॉलेजचे प्रा.गजानन व्हॅकळी,प्रा.वसीम.सय्यद,प्रा.रश्मी देसाई,शिक्षिका साै.अमृते,सौ भोर व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दीन हा फक्त स्मृती दीन साजरा करण्या पुरता मर्यादित न राहता त्यांचे समानतेचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.तर अस्पृश्यतेमुळे ज्या विद्यार्थ्यांला वर्गाच्या बाहेर बसून अभ्यास करावा लागला त्याचं विद्यार्थ्याने शिक्षणातील अनेक उच्च पदव्या संपादन करून या देशाला सर्वोच्च महान संविधान बहाल केले व असमानतेला झिडकारून समानतेचे अधिकार प्राप्त करून दिला.म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले पाहिजे.”असे भावपूर्ण उदगार सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर यांनी खारेपाटण हायस्कूल येथील महापरिनिर्वाण दीन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.

error: Content is protected !!