वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वैभववाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भावनांमध्ये अभिवादन करण्यात आले. तसेच तालुक्यात सर्वत्र अभिवादन रॅली, भीम गीत गायनाचा कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले.
तालुक्याचा मुख्यकार्यक्रम हा वैभववाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे शुक्रवारी रात्री बारा सुरु करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला, तसेच थाई पॅगोडा येथील प्रतिमेला वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महामानवांच्या जयघोषाने परिसरातून सोडला. पंचशीलवाटिकेमध्ये सामुदायिक त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले. यावेळी तालुका संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव,महिला मंडळाचे अध्यक्ष शारदा कांबळे,सचिव रविंद्र पवार,शरद कांबळे, प्रमोद जाधव, मंगेश कांबळे,अंकुश पवार, उत्तम पवार,प्रा. गुलदे, उदय जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने तालुका संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शनिवारी सकाळपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येत होते. यावेळी भीम गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तालुक्यातील गायकांनी अभिवादन केले. भगवान खांबाळेकर, शिवाजी पवार,राकेश जाधव, रमेश सपकाळ,चंद्रकांत जाधव,अर्जुन कदम, विलास तांबे,सुरेश जाधव, दिलीप पवार, पिंट्या कांबळे, प्रिया कांबळे दिप्तेश कांबळे प्रभाकर कांबळे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य पनण महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे, दिगंबर पाटील, महेश संसारे प्रकाश पाटील, अतुल सरवटे,अवधूत नारकर,प्राची तावडे,स्नेहलता चोरगे यांनी स्मारकात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.












