हॅन्डीकॅप अर्न ॲन्ड लर्न ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
वैभववाडी (प्रतिनिधी) : ६ डिसेंबर २०२५ रोजी सर्वत्र महापरिनिर्वाण दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. अर्जुन रावराणे विद्यालय, श्री.जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. वैभववाडी पोलिस निरीक्षक सोनवलकर यांनी दिपप्रज्वलन केले. तर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे आत्मविश्वास असेल तर विद्यार्थी शालेय जीवनात यशस्वी होतो असे मत पोलिस निरीक्षक सोनवलकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांना जंगलाचा राजा सिंह तसेच काही पौराणिक कथांची उदाहरणे आपल्याला मनोगतात दिली. या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेत हॅन्डीकॅप अर्न ॲन्ड लर्न ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अवधूत राणे, संचालक अनिता पाटील, गितांजली राणे. यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन उच्च शिक्षण घ्यावे असे आवाहन केले. त्यानंतर प्रशालेतील गरीब गरजू होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे, अर्न ॲन्ड लर्न ट्रस्ट मुंबई चे अवधूत राणे, अनिता पाटील,गितांजली राणे, माजी विद्यार्थी दत्ताजी रावराणे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.जाधव यांनी केले.












