डबलबारी भजनासह विविध संसकृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : महापुरुष देवालय ओटववाडी येथे रविवार दिनांक १४ डिसेंबर, २०२५ पासून हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. या धार्मिक सोहळ्यानिमित्त आठवडाभर विविध भजने, पारंपरिक कार्यक्रम व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त १४ डिसेंबरला रात्री ठीक १०.३० वाजता पारंपरिक डबलबारी भजनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या जंगी सामन्यात श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ मुंबई (भांडुप) येथील बुवा भगवान लोकरे आणि श्री पावणादेवी प्रासादिक भजन मंडळचे बुवा प्रमोद हर्याण हे आमने-सामने येणार आहेत.
मंगळवार दिनांक १६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सोबतच रात्री ८.०० ते २.०० या वेळेत भजन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून आरती, तीर्थप्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.












