राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांच्या उपस्थितीत अनुभव शिक्षा केंद्राची जिल्हास्तरीय सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्राची जिल्हा सभा दि. २३ एप्रिल २०२३ रोजी गोपुरी आश्रम, वागदे येथे पार पडली. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर उपस्थित होते. जिल्हास्तरीय सभेची सुरुवात अनुभव शिक्षा केंद्राची माहिती आणि सर्वांच्या ओळखीने झाली. यानंतर गट तयार करून कोकणातील युवक प्रश्नांवर आणि वातावरण बदलावरती चर्चा करण्यात आली. त्यानंतर युवकांचा कल स्पर्धापरिक्षा मध्ये कमी का असतो याचे विश्लेषण केले. युवकांचा कल वाढावा यासाठी विशेष प्रयत्न करून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करायचे ठरले. यासाठी वेगवेगळ्या संस्थांना सहयोगासाठी भेट देण्याचे ठरले. शेतीविषयक युवकांमध्ये आवड निर्माण करणे. तीन शिबीर घेण्यासंदर्भात चर्चा झाली. यामध्ये अमन के साथी, पर्यावरण बदल व सामाजिक न्याय आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे शिबिरांचे नियोजन मे महिन्यामध्ये करण्याचे ठरले. या मिटिंग वेळी देवगड, कणकवली व सावंतवाडी तालुक्यातील प्रमुख साथी उपास्थित होते.

error: Content is protected !!