फोंडाघाट (प्रतिनिधी) : 53 व्या विज्ञान प्रदर्शन 2025-26 मध्ये घोणसरी हायस्कूलचे प्रयोगशाळा सहाय्यक अनिल चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक/परीचर प्रायोगिक संसाधन गटात तालुकास्तरीय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या “एकसर जोडणी समांतर जोडणी फरक अभ्यासाने” या संसाधनास प्रथम क्रमांक मिळाला व जिल्हास्तरीय प्रदर्शनात निवड झाली होती. जिल्हास्तरीय प्रदर्शनात ही प्रथम क्रमांक पटकाविला व त्यांची राज्यस्तरीय प्रदर्शनास निवड झाली आहे. अनिल चव्हाण यांनी प्रयोगशाळा सहाय्यक/परीचर गटात राज्यस्तरावर आपले, शाळेचे, गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव लौकिक केल्याने सर्वच क्षेत्रातुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कौतुक केले जात आहे.
अनिल चव्हाण यांच्या शैक्षणिक प्रायोगिक संसाधनाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड










