महाराष्ट्र दिव्यांग महिला क्रिकेट संघ उपकर्णधार शिल्पा गांवकर डोंगरे यांचा कॉलेज कट्टा ग्रुप आचरा कडून सहृदय सत्कार

आचरा (प्रतिनिधी) : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे संपन्न झालेल्या दिव्यांग महिलाच्या ‘उमंग’ चषक क्रिकेट स्पर्धेत झारखंडला पराभूत करून महाराष्ट्राला विजेते पद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र संघाची उपकर्णधार तसेच आचरा गावची सुकन्या शिल्पा गोविंद गांवकर उर्फ शिल्पा कुणाल डोंगरे हिचा आचरा कॉलेजच्या २०००-२००१ बारावी बॅच, कॉलेज कट्टा ग्रुप कडून वायंगणी स्वामी समर्थ मठ येथे शाल, श्रीफळ, स्वामींची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सहृदय सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कविता गोलतकर, दक्षता सुर्वे, मुकेश सावंत, गणेश मयेकर, माधुरी बापट, परेश चव्हाण, एकनाथ साटम, चंद्रकांत गोलतकर, सुदर्शन गांवकर, रत्ना लब्दे, विवेक परब, अजय कोयंडे, बाबल पडवळ, महेश शेटये, आदी उपस्थित होते.

या सत्काराला उत्तर देताना शिल्पा म्हणाली की, माझा क्रिकेटचा सुरूवातीचा काळ सोपा नव्हता मला मैदानात धावताना पाहिल्या नंतरही लोकांकडून दुषणे दिली जात. परंतु माझ्या पतीच्या खंबिर पाठिंब्यामुळे आज मी या अपंगांत्वावर मात करुनही महाराष्ट्र दिव्यांग संघासाठी क्रिकेट खेळतेय हि गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. क्रिकेट स्पर्धेला जाणे हि पण एक माझी स्पर्धाच असते क्रिकेटचे सर्व किट आणि एक वर्षाची मुलगी यांना बरोबर घेऊन जाताना हि खरी कसोटी पार करावी लागते‌. माझ्या सारख्या खेळाडूला आदर्श माणून ग्रामीण भागात अनेक खेळाडू तयार व्हायला हवे अशी अपेक्षा हि व्यक्त करताना कॉलेज मधील मित्र-मैत्रीण यांचे प्रोत्साहन पाठिंब्या बाबत शिल्पा यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप मुकेश सावंत यांनी केले.

error: Content is protected !!