दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

दिल्ली (न्यूज ब्युराे) : भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांची महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे आणि आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा झाली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या मार्गदर्शनातून पक्ष संघटना अधिक प्रभावीपणे उभारण्यासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी नव्या जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!