बांदा (प्रतिनिधी) : वै. ह. भ. प. प. पू. सद्गुरू वासुदेव महाराज वझे यांच्या पावन आश्रयाखाली चालत आलेल्या झोळंबे येथील श्री पांडुरंग मंदिरात आषाढी एकादशी निमित्त तीन दिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव शुक्रवार २४ जुलै ते रविवार दिनांक २६ जुलै या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
उत्सवाची सुरुवात शुक्रवार, २४ जुलै रोजी रात्री ८ वाजता दशमी ज्योती पूजन व हरिपाठाने होईल. शनिवार, २५ जुलै रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती व महापूजा, त्यानंतर सकाळी भजन, सायंकाळी ७ वाजता हरिपाठ तसेच रात्री ग्रामस्थांच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रविवार, २६ जुलै रोजी पहाटे ५ वाजता काकड आरती, महापूजा व भजनानंतर सकाळी ११ वाजता पारंपरिक दिंडी काढण्यात येणार असून, महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. या तीन दिवसीय धार्मिक सोहळ्यात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच आपली सेवा अर्पण करून भागवत भक्तीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री पांडुरंग मंदिर झोळंबे उत्सव समितीच्या अध्यक्षांनी केले आहे












