मुला- मुलींनी सुविधांचा, आपल्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयोग करून, यश संपादन करावे — उमेश वंजारे

फोंडा – नरामवाडी शाळेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने मोफत दप्तर वाटप !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शिक्षण हा प्रत्येक मुला- मुलींचा मूलभूत अधिकार आहे. त्यांना सुविधांसह, स्पर्धात्मक शिक्षण मिळावे. याची सुरुवात फोंडाघाट- नरामवाडी शाळेत पहावयास मिळाली. फोंडा- माळवाडी शाळेची माजी विद्यार्थिनी आणि विद्यमान देवगड- जामसंडे नगरपंचायतीची पाणीपुरवठा सभापती सौ. तन्वी योगेश चांदोस्कर तथा उज्वला वंजारे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मुला- मुलींना मोफत दप्तर वाटप मान्यवरांचे हस्ते केले.

यावेळी बोलताना,उमेश वंजारे यांनी ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेची जाण असल्याने दप्तराची सुविधा, आपल्याला शालेय जीवनात नक्कीच उपयोगी पडेल. त्याचा उपयोग करून यश संपादन करा. शाळेचे नाव मोठे करा. असे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्या. जोशी मॅडम, सहशिक्षिका, पालक वर्ग आणि विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या. आपल्याला मिळालेल्या नवीन दप्तराचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता….

error: Content is protected !!