फोंडाघाट (प्रतिनिधी) : जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी यांच्या रामानंदाचार्य संप्रदायच्या वतीने सामाजिक उपक्रम अंतर्गत वनराई कच्चे बंधारे फोंडाघाट सेवाकेंद्राच्या वतीने बांधण्यात आले. वाघोबा मंदिर आणि लिंगाचे मंदिर असे दोन कच्चे बंधारे बांधण्यात आले. याकरिता पुंडलिक देसाई, शशांक ऐकावडे, एकता सावंत, विजय मेस्त्री, जयश्री गुरव, दिपाली गुरव, जयश्री राणे, माधवी राणे, विनायक सावंत. इ. ग्रामस्थानी सामाजिक बांधिलकीतून सेवा अर्पण केली. यामुळे परिसरातील विहिरी-भाजीपाला इ. साठी चा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या उपक्रमाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्यजी नरेंद्रचार्यजी यांच्या संप्रदायातर्फे फोंडाघाट येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती










