50 वा वाढदिवस कुटुंबिय आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत साजरा
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
चौके (अमोल गोसावी) : चौके गावचे प्रतिथयश उद्योजक बिजेंद्र गावडे यांचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस शनिवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी सर्व कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, चौके ग्रामस्थ या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उद्धव सेनेचे माजी आमदार वैभव नाईक,यांच्या प्रमुख उपस्थितीत बिजेंद्र गावडे यांचा 50 वा वाढदिवस केक भरवून साजरा करण्यात आला.
यावेळी शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी असे सांगितले की ” एक उत्कृष्ट व सर्व क्षेत्रात हिरीरीने काम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून बिजेंद्र गावडे यांच्याकडे समाजात पाहिले जाते. अत्यंत मेहनतीने, कष्टाने आणि जिद्दीने स्वतःचे व्यावसायिक साम्राज्य उभे करून आज त्यांनी वयाची ५० वर्षे पूर्ण केली आहेत. याही पुढे जाऊन वयाची शंभरी त्यांनी पूर्ण करावी या सदिच्छा. बिजेंद्र आणि मी आमची मैत्री ही पूर्वी होती,आताही आहे आणि यापुढेही राहील आमच्यामध्ये कधीही दुरावा निर्माण होणार नाही. बीजी आणि माझ्या मधील जवळीक ही इतरांपेक्षा जास्तच आहे.आम्ही एक कुटुंब आहोत आणि कुटुंबा प्रमाणेच राहणार आहोत. भविष्यात त्यांनी जिल्हास्तरावर राजकीय क्षेत्रातही यश संपादन करावे असे बोलून शुभेच्छा दिल्या.
तत्पूर्वी बिजेंद्र गावडे यांच्या पत्नी सौ. मनाली गावडे यांच्या सह परिवारातील सर्व महिलांनी ५० दिव्यांनी बिजेंद्र गावडे यांना औक्षण केले. त्यानंतर बिजेंद्र यांचा मुलगा साहिल, मुलगी ऋचा, भाऊ दत्ता, नितीन, बहिणी मनीषा, उज्वला, तसेच इतर सर्व कुटुंबीय, नातेवाईक आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भव्य केक कापण्यात आला यावेळी दत्ता सामंत आणि वैभव नाईक या दोघांनीही बिजेंद्र गावडे यांना केक भरवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बिजेंद्र गावडे यांचे अध्यात्मिक गुरु रामकृष्ण ऊर्फ बापू जडये गुरुजी आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, चौके सरपंच पी के चौककर मालवण शहर अध्यक्ष नूतन नगरसेवक दीपक पाटकर, सहदेव बापार्डेकर, निना मुंबरकर, चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश परब आणि पदाधिकारी,चौके हायस्कूलचे मुख्याध्यापक रसिका गोसावी, हायस्कुलचे आजी माजी शिक्षक,चौके व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सरपंच पी. के. चौकेकर, शिवसेना मालवण तालुका प्रमुख राजा गावडे, उद्धव सेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर,मंदार गावडे,बाबू टेंबुलकर, जेष्ठ “ग्रामस्थ सदाशिव गावडे -गुरुजी यांच्यासह चिरेखाण संघटनेचे सर्व सदस्य, बिजेंद्र गावडे यांचे १९९० दहावी बॅचचे मित्र मैत्रिणी, जेष्ठ उद्योजक नाना आंबेरकर, सागर गोवेकर, कट्टा येथील विवेक नेवाळकर,जी.एच.फिटनेस कट्टाचे गौरव हिर्लेकर, डॉ.संजय पोळ,डॉ.शरदचंद्र काळसेकर,वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा मंडळाचे सर्व कार्यकर्ते, मोहन गावडे, हेमंत चव्हाण, मंगेश चव्हाण,प्रीतम गावडे, सीझर डिसोझा, यांच्या सह नातेवाईक, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून बिजेंद्र गावडे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आकर्षक मंडप, लाईट सजावट गाण्यांची मैफिल, स्नॅक कॉर्नर, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा पौराणिक नाट्य प्रयोगही सादर करण्यात आला त्याचा अनेक नाट्यरसिकानी लाभ घेतला.










