आचरा (प्रतिनिधी): ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने आरोंदा येथील मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी मच्छीमार बांधव व ग्रामस्थ यांना भेट दिली यावेळी आपल्या समस्या संतोष नाईक यांच्यासमोर मांडल्या व आपल्याला ह्युमन राईट संघटनेच्या वतीने न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन दिले. गेले वीस वर्षे तेथील मच्छिमार बांधव हे आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे त्यांना त्यांचे हक्क मिळत नव्हते. मच्छीमार बांधवांनी आपल्या निवेदनात पुढील समस्या मांडल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या रहिवाशांचा उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे मच्छीमारी, परंतु मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उत्खनामुळे त्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन झाल्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या घरामध्ये पाणी घुसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे संरक्षण भिंत बांधण्यात यावी. अशी त्यांची अपेक्षा आहे. तसेच या मच्छीमार बांधवांना वाळू माफियांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो. त्यामुळे ते आपले जीवन भीतीच्या छायेखाली जगत आहेत. सरकार दरबारी त्यांना कुठलीही मदत मिळत नाही. तसेच गोवा राज्य जवळ असल्यामुळे तेथील मुले, मुली मोठ्या प्रमाणात गोवा राज्यामध्ये नोकरीसाठी ये जा करत असतात परंतु वाळू माफिया त्या मुलांना धमकावत असतात असे बरेच प्रकार त्या मच्छिमार बांधवांन सोबत घडत आहेत. आणि या सगळ्याच निवेदन त्यांनी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेला दिलेले आहे. मच्छीमार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष- संतोष नाईक, जिल्हा सचिव- अर्जुन परब, सावंतवाडी तालुका सचिव- संदीप चांदेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष- सोहम शारबिंद्रे, मालवण तालुका जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर तसेच लोकमतचे पत्रकार दीपक तारी उपस्थित होते. निवेदन देते वेळी आरोंदा सरपंच सौ. गीता तारी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष गोकुळ दादा मोरे, सचिव शंकर पेडणेकर, उपाध्यक्ष नयन चोडणेकर,भाई वळणेकर, सुनील वेळणेकर, तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिलांचा समावेश होता.
ह्युमन राईट कोकण अध्यक्ष संतोष नाईक यांनी साधला आरोंदा वासीयांशी संवाद











