कणकवलीत भगवा चषक ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २०२६; २७ ते ३१ जानेवारीदरम्यान रंगणार सामने

आशिये माळ येथे भगवा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन; विजेत्यास १ लाख १ रुपयांचे पारितोषिक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली भगवा चषक कलमठच्यावतीने ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही खुली स्पर्धा असून यात एक तालुका एक संघ असणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषीक १ लाख १ रु. व चषक तर द्वितीय पारितोषीक ५० हजार १ रु. असे ठेवण्यात आले आहे. सदरची स्पर्धा २७ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आशिये माळ-कणकवली येथे होणार आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. संघांनी नाव नोंदणीसाठी ८ जानेवारी २०२६ पर्यंत संपर्क साधायचा आहे. अधिक माहितीसाठी पावसकर फुलवाले, कणकवली मेनचौक-७३५०२६५००० येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!