पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून आचिर्णेत ट्रान्सफार्मर ,विद्युत पोलसाठी 47 लाखांचा निधी

जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांचा यशस्वी पाठपुरावा

वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आचिर्णे गावातील 5 ट्रान्सफार्मर बसविणे आणि नवीन विद्युत पोल बसविण्याच्या कामाचा शुभारंभ जेष्ठ प्रतिष्ठित नागरिक सुभाष रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परिषद माजी सभापती दिलीप रावराणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी तब्बल 47 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी आचिर्णे सरपंच वासुदेव रावराणे, सुनील रावराणे, मधुकर रावराणे, भाजपा कार्यकर्ते उत्तम सुतार, मोहन रावराणे, संतोष रावराणे, सत्यवान जाधव, भैरीभवाणी विकास मंडळचे अध्यक्ष अवधूत रावराणे, उमेश पवार उपस्थित होते.

आचिर्णे गावातील मधलीवाडी, तेलीवाडी, रासाईमंदिर, पिंपळवाडी, सिद्धाचीवाडी परिसरातील ग्रामस्थांना वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. वाढलेल्या विजग्राहकांमुळे वाढीव विद्युतपुरवठा होणे गरजेचे होते. यासाठी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे नवीन ट्रान्सफार्मर आणि जुने पोल बदलून नवीन पोल बसविण्याची मागणी केली होती. दिलीप रावराणे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री नितेश राणे वरील प्रत्येक वाडी साठी प्रत्येकी 100 केव्हीचे पाच ट्रान्सफार्मर आणि 60 जुने विद्युत पोल बदलून नवीन 60 पोल बसविण्यासाठी एकूण 47 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. नवीन जास्त क्षमतेच्या ट्रान्सफार्मर मुळे वीजपुरवठा सुरळीत होणार असून स्थानिक ग्रामस्थांची वाढीव आणि सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण होणार आहे. या कामासाठी भरीव निधी दिल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे यांचे आचिर्णेवासीयांनी आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!