कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओसरगाव ची सुकन्या दिव्या दिलीप राणे हिने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा युवक संचालनालाय च्या वतीने राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटात राज्यातील 48 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत दिव्या हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करत कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले. युवक कल्याण पतपेढी कणकवलीचे व्यवस्थापक दिलीप राणे यांची दिव्या ही सुकन्या असून, ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांची पुतणी आहे. या यशाबद्दल दिव्या हिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.













