नववर्षाचा निरोगी जीवनाचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा संकल्प; 22 जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर रत्नागिरीत
कुडाळ (प्रतिनिधी) : नविन वर्षात उत्साही आनंदी, निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्याचे रहस्य उलघडवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद अनुभुती शिबीराचे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय जवळ, कुडाळ येथे होणार आहे. त्यासाठी इच्छूकांनी नोंदणी साठी लिंक : http://aolt.in/721399 आपली नाव नोंदणी या लिंकवर करावी. 22 जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर रत्नागिरीत येणार असल्याने त्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे.
या शिबिरात श्वासोच्छ्वासाची जगप्रसिद्ध आणि ऊर्जायुक्त प्रक्रिया सुदर्शन क्रिया अनुभवता येणार आहे. ३० डिसेंबर संध्याकाळी ६.३० ते ९.३०, ३१ डिसेंबर सकाळी ६.३० ते ९.३०, १ जानेवारी सकाळी ६.३० ते ९.३०, 2 जानेवारी सकाळी ६.३० ते ९.३० या चार दिवसाच्या कालावधीसाठी हे शिबिर होणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या शिबिरात सहभाग घेतल्यामुळे निरोगी शरीर, आनंदी व तणावमुक्त मन, दैनंदिन कामात गुणात्मक वृद्धी, ऊर्जावर्धक ध्यान आणि प्राणायाम, व्यक्तिमत्त्व विकासनासाठी पूरक ज्ञान मिळणार आहे. तरी या शिबिरात सहभाग घेण्यासाठी नारायण – 9765775817, प्रमोद – 9404438389, विनायक – 9422373883, अंजली – 9762717528, सुचित्रा – 7719813360 यांच्याशी संपर्क साधावा.










