देवगड तालुक्यातील गोवळ–पाटगाव बॉक्‍साइट खनिज प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

नांदगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मौजे गोवळ सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, मणचे, पाळेकरवाडी,महाळुंगे या गावाच्या कार्यक्षेत्रात बाॅक्साइट खनिज प्रकल्पाबाबत सर्वेक्षणाचे काम जिओ मराईन सोल्युशन सोल्युशन प्रा. लि. या कंपनीमार्फत करण्यात येणार आहे असे समजल्यानंतर वरील सर्व गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत खनिज प्रकल्पामुळे आंबा, काजू,शेती तसेच जैवविविधतेवर व औषधी वनस्पतीवर विपरीत परिणाम होणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी पाटगाव येथील श्रीराम मंदिर आश्रम येथे एकत्र येत विरोध दर्शवित आपले म्हणने जिल्सा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार देवगड याच्याकडे मांडले. चर्चेअंती मार्गदर्शन सभेत ग्रामस्थाचा विरोध असेल तर आपण वरीष्ठ कार्यालयात याची माहिती देऊन पुढील कार्यवाही करण्याबरोबर सर्व्हे थांबविणार असल्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले.

यावेळेस खनिकर्म विभाग अधिकारी, तहसीलदार रमेश पवार,जिओ मराईन सोल्युशन सोल्युशन प्रा. लि. याच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत माजी सभापती रवी पाळेकर,भास्कर पाळेकर, नाना गोडे,पाळेकरवाडी सरपंच उदय पाळेकर,गोवळ दक्षता मेस्त्री,पाटगाव नितेश गुरव,पेंढरी मंगेश आरेकर,मणचे दिपक तोरस्कर,म्हाळुंगे संदिप देवळेकर, मिलिंद सोमले,दिनेश मेस्त्री,शिवाजी सोमले,विश्वनाथ सोमले,संजय सोमले, धनंजय गोडे,उमेश येजरकर,निलेश परब दत्तगुरू सोमले,दिपक गुरव,तुकाराम घाडी,तात्या घाडी,उदय गुरव,निलेश बाणे,कमलेश गुरव याच्यासह गोवळ सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, मणचे, पाळेकरवाडी,महाळुंगे या गावातील लहान थोर ग्रामस्थ व महीला हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे, मौजे गोवळ सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, मणचे, पाळेकरवाडी,महाळुंगे या भागात बाॅक्साइट खनिज प्रकल्पाबाबत सर्व्हेक्षण होत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांना समजल्या याची माहिती वरील सर्वामार्फत सरपंच ग्रामपंचायत गोवळ यानी दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी देवगड तहसीलदार रमेश पवार याना याबाबत बैठक लावण्यासाठी पत्र दिले होते. यानंतर याबाबत खनिकर्म विभागास तहसिलदार कार्यालयातून २३ डिसेंबर रोजी पत्र देत मंगळवारच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे खनिकर्म अधिकारी याना कळविण्यात आल्यानतंर आजची बैठक संपन्न झाली. यावेळेस या सभागृहाच्या आतिल बाजूसह बाहेर मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान बैठकीत अधिकारा-यांसमोर रवि पाळेकर,मिलिंद सोमले,दीनेश मेस्त्री, दिपक प्रभू,नाना गोडे यानी ग्रामस्थांच्या वतीने प्रकल्प विरोधाबाबत म्हणने मांडण्यात आले.यात बॉक्साइट साठ्यांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन असल्याने  केवळ सर्वेक्षण नसून, उद्या होणाऱ्या विनाशाची पहिली पायरी आहे,या भागात जर उत्खनन झाले, तरनिसर्गाचा समूळ नाश होईल,भात, नाचणी यांसारखी अन्नपिके उद्ध्वस्त होतील.हापूस आंबा, काजू, फणस, कोकमसारखी नगदी बागायती नष्ट होतील.पाणीस्त्रोत, जंगलसंपदा, जैवविविधता कायमची संपेल.गरीब, शेतकरी, मजूर यांच्या उपजीविकेवर घाला बसेल हे केवळ विकासाचे नव्हे तर आमच्या अस्तित्वाचे, आमच्या जीवनाचे, आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्याचे संकट आहे.हा संघर्ष विकासाविरोधात नाही, तर विनाशाविरोधात आहे. हे आमचे मरण वाचवणे आहे, आमचा सर्वनाश टाळावा असे सांगत विरोध दर्शवित आला.

म्हणूनच आम्ही ठामपणे जाहीर करतो की या भागात बॉक्साइट सर्वेक्षणच नको, उत्खननास तर कदापिही परवानगी नाही.या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थ, शेतकरी, युवक, महिला, लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी यांनी एकत्र येऊन कडाडून विरोध करण्यासाठी पुढील ठोस धोरण ठरविणार असून ही कळकळीची आणि अत्यावश्यक विनंती आहे असेही सांगण्यात आले.निसर्ग वाचवा जीवन वाचवा,आमची जमीन,आमचा हक्क आम्ही लढणारच तसेच अशा खनिकर्म प्रकल्पामुळे अनेक गावाची काय परिस्थिती झाली आहे असे उपस्थित ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

ग्रामस्थांचे म्हणने वरीष्ठ कार्यालयास पाठविणार-उमेश बर्डे,जिल्हा खनिकर्म अधिकारी सिंधुदुर्ग (बाॅक्स)

या सर्व्हेक्षणास ग्रामस्थाचा विरोध असून तीव्र प्रतिक्रिया आहेत. तरी सबंधित सर्व्हेक्षण करणा-या कंपनीने सर्व्हेक्षण केल्यास ग्रामस्थांनी तीव्र शब्दात विरोध केला असून याबाबत आपण नागरीकांचे म्हणने एकूण घेत वरीष्ठ कार्यालयास ग्रामस्थांचे विरोधाबाबत असेलेले म्हणने पाठवणार असल्याचे संपर्क केला असता सांगितले.

ग्रामस्थांचा विरोध असल्यास होणार नाही :रमेश पवार,तहसीलदार देवगड

आजची बैठक देवगड तालुक्यातील मौजे गोवळ सोमलेवाडी, पाटगाव, पेंढरी, मणचे, पाळेकरवाडी,महाळुंगे गावातील  खनिज प्रकल्पाबाबत शोधकार्याचा सर्व्हे थांबविण्याबाबत होती. या बैठकीत या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असल्याने होणार नसल्याचे संपर्क केला असता सांगितले.

error: Content is protected !!