अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा जिल्हा बँक लाभार्थ्यांशी उद्या संवाद

उपस्थित राहण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे आवाहन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): आमदार नितेश यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यावर असून या दौऱ्याच्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देणार आहेत. यावेळी ते प्रधान कार्यालय सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यां सोबत संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमास आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी, उपाध्यश अतुल काळसेकर, बँक संचालक उपस्थित रहाणार आहेत. या माध्यमातून मराठा तरुण तसेच अर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरूंना महामंडळच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने मिळतो याचा आढावा ते घेणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे मनिष दळवी स्वागत करणार आहेत. तसेच यावेळी नरेंद्र पाटील हे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांबरोबर संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या योजना ग्रामीण भागातील मराठा तरुणापर्यंत पोहोचाव्यात आणी त्यासाठी काम करणारे प्रशासन अधिकारी बँक अधिकारी यांच्या समिती एकत्र बैठक व्हावी आणी ती बैठक स्वत: अध्यश नरेंद्र पाटील यांनी सिंधुदुर्गात येउन घ्यावी असे आग्रहाचे निमंत्रण आमदार नितेश राणे यांनी त्यांना दिले आहे. मराठा समाजातील उद्योग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक प्रत्येकाला १५ लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज महामंडळ दिले जाते या सर्व कामकाजाचा आढावा या दौऱ्या दरम्यान अध्यक्ष नरेंद्र पाटील घेणार आहे. त्यासाठीच आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रण मान देऊन अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हे गुरुवार दिनांक २७ एप्रिल रोजी येत आहेत. दुपारी दोन वाजता ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला भेट देणार आहेत. यावेळी जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांबरोबर ते संवाद साधणार आहेत.या संवाद कर्यक्रमास लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनिष दळवी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!