सावंतवाडीत उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्या भूमिपूजन

महसूलमंत्र्यांसह खासदार आणि पालकमंत्र्यांची विशेष उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन समारंभ उद्या शुक्रवार दि. ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील कार्यालय परिसरात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन होणार असून, यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमास आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज उपस्थित राहणार आहेत.

या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले आणि सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!