सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण संपन्न
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : पोलीस रेझिंग डे सप्ताहनिमित्त दिनांक 02 जानेवारी ते दिनांक 08 जानेवारी, 2026 या मुदतीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या पार्श्वभूमीवर दिनांक 04 जानेवारी रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग व अपर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी वेंगुर्ला कॅम्प येथे खुली मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केलेली होती.
सदर स्पर्धेकरिता सर्व वयोगटातील विद्यार्थी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कार्यालय कर्मचारी, पोलीस पाटील, होमगार्ड, खेळाडू, तसेच शाळा महाविद्यालय यांना सदर स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील जवळ जवळ १०० जण सहभागी झाले होते.
यावेळी निसर्ग ओतारी पोलीस निरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे, सामाजिक कार्यकर्ते प्रसंन्ना देसाई, कांबळे पोलीस उपनिरीक्षक वेंगुर्ला पोलीस ठाणे, बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.जयसिंग नाईक, प्रा.कमलेश कांबळे, प्रा.वासुदेव गावडे, प्रा. शिवकन्या तोडकर हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खालील स्पर्धकांनी क्रमांक मिळवीले.
पुरुष गट
प्रथम क्रमांक – शंकर परब
द्वितीय क्रमांक – प्रशांत खोत होमगार्ड
तृतीय क्रमांक – तेजस देसाई .होमगार्ड
महिला गट
प्रथम क्रमांक – तेजस्वी धुरी होमगार्ड .
द्वितीय क्रमांक – मृणाली नेरुरकर होमगार्ड .
तृतीय क्रमांक – शिवन्या चिचकर पोलीस पाटील.












