खेळातून सांघिक भावना निर्माण होते – जयेश धुमाळे

बोर्डवे येथील बीपीएल क्रिक्रेट स्पर्धेत स्वरूप इलेव्हन महाविजेता

कणकवली (प्रतिनिधी) : खेळातून सांघिक भावना निर्माण होते. जिंकण्याची जिद्द मनात येते. मन आणि मनगट मजबूत करण्यासाठी खेळ आवश्यक आहेत, असे प्रतिपादन कणकवली नगरपंचायतचे नगरसेवक जयेश धुमाळे यांनी केले. कणकवली तालुक्यातील बोर्डवे गावातील युवा मित्रमंडळ आयोजित बोर्डवे प्रीमिअर लीग स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून धुमाळे संबोधित करत होते.

बोर्डवे प्रीमिअर लीग स्पर्धेचा स्वप्नील बागवे संघमालक असलेला स्वरूप इलेव्हन संघ महाविजेता ठरला. तर संघमालक जयप्रसाद तावडे असलेला नाना इलेव्हन हा संघ उपविजेता ठरला. नगरसेवक जयेश धुमाळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेते संघ तसेच वैयक्तिक पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी बोर्डवे उपसरपंच अक्षय शिंदे, माजी उपसरपंच संतोष येंडे, बोर्डवे उबाठा शिवसेना शाखाप्रमुख नरेश येंडे, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वितेसाठी विशाल येंडे, सचिन शिंदे, अक्षय शिंदे, नारायण घाडी, ओंकार घाडी, हनुमंत एकावडे, प्रशांत एकावडे, विराज येंडे, वेदांत पालव, निलेश परब, कार्तिक साळवी, अर्णव मोडक, स्वप्नील खंदारे, धीरज देवळी, अनिकेत देवळी, बंटी देवळी, गणेश कारेकर, वैभव कारेकर, रोहित येंडे, प्रकाश पेडणेकर, मयूर शिंदे, दत्ता एकावडे, प्रथमेश वारंग आदींनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!