शितल मांजरेकर यांनी केलेल्या मागणीला यश
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार सौ शितल रामदास मांजरेकर यांनी या विभागातील मतदारांच्या मागणीनुसार एस एम हायस्कूल मागील किनई रोड दुरुस्त करण्याबाबत वचन दिले होते. नगरपंचायत निवडणुकीमध्ये पराभूत होऊन सुद्धा आपले दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी व शीतल मांजरेकर यांनी नगरपंचायत कणकवली यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार आज तातडीने एस. एम हायस्कूल मागील किनई रोड रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.

नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधील नागरिकांना आपल्या दिलेल्या वचनाची आठवण ठेवत तातडीने कणकवली नगरपंचायत यांच्याकडे अर्ज करून प्रभाग क्रमांक दहा मधील एसएमएस स्कूल मागील किनाई रोड ला ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे सदरच्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी यांची ये जा होत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या विभागात धुळीची साम्राज्य पसरली असून येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याच प्रमाणे ९ फेब्रुवारी पासून आंगणेवाडी भराडी देवी ची यात्रा सुरू होत असल्याने आचरा मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बहुतांशी वाहतूक याच रस्त्याने होत असल्याने या मार्गाने जाणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडी टाळावी त्याचप्रमाणे वाहतुकीमुळे होणारे धुळीचे साम्राज्य कमी व्हावे व येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहोचू नये याकरिता तातडीने एस एम हायस्कूल मागील किनाई रोडची दुरुस्ती करावी या आशयाच्या मागणीची पत्र शीतल मांजरेकर कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष यांना देण्यात आले होते.

दरम्यान प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवार शितल मांजरेकर यांनी केलेल्या तातडीच्या मागणीच्या अर्जाची दखल घेत कणकवली नगरपंचायत मार्फत आजपासून एसएमएस स्कूल मागील तीनही रोडच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून शितल मांजरेकर या स्वतः जातीनिशी थांबून कामाची पाहणी करत आहेत.














