कनेडी दशक्रोशीत संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा होणार संयुक्त जयंती उत्सव

महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन

कणकवली (प्रतिनिधी) : मानवता आणि समानता तत्वाचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी रोहिदास महाराज, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रसंत आणि महामानवांची संयुक्त जयंती कनेडी दशक्रोशीत साजरी करण्याचा निर्णय चर्मकार आणि बौद्ध समाजबांधवांच्या वतीने घेण्यात आला आहे. कनेडी दशक्रोशीतील महामानव संयुक्त जयंती महोत्सव समिती स्थापन करण्यात आली असून
समितीच्या अध्यक्ष पदी अशोक कांबळे व कार्याध्यक्ष पदी संजय उर्फ छोटू कदम, सचिवपदी आनंद जाधव, खजिनदारपदी नामदेव जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

कनेडी दशक्रोशीतील चर्मकार समाज व बौद्ध समाजाची संयुक्त सभा सांगवे ग्रा.प.च्या सभागृहात रविवार ११ जानेवारी रोजी संपन्न झाली. या सभेत संत शिरोमणी रोहिदास महाराज.छत्रपती शिवाजी महाराज.व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संयुक्त जयंती कनेडी दशक्रोशीतील सर्व चर्मकार व बौद्ध समाज बांधवानी एकत्र येऊन साजरी करण्याचे ठरविण्यात आले. या वेळी महामानव संयुक्त महोत्सव समिती नेमण्यात आली समितीच्या अध्यक्ष पदी अशोक कांबळे.कार्याध्यक्ष पदी संजय उर्फ छोटू कदम.सचिवपदी.आनंद जाधव खजिनदार पदी नामदेव जाधव.उपाध्यक्ष श्रीधर तांबे.सल्लागार पदी शंकर जाधव,प्रदीप कांबळे अर्जुन कांबळे.भाग्योदय कांबळे,संतोष जाधव.संदीप तांबे,डॉ.अशोक कदम.चंद्ररत्न कांबळे सहसचिव पदी महेंद्र कदम व संजय तांबे.

संघटक पदी सागर चव्हाण सुंदर जाधव संकेत कांबळे व अर्जुन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली,या वेळी चर्मकार व बौद्ध समाजातील बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!