शासकीय रेखाकला परिक्षेत अर्जुन रावराणे विद्यालय केंद्राचे तसेच प्रशालेचे उज्वल यश

शाळेचा दोन्ही परिक्षेचा निकाल १०० % तर केंद्राचा एलिमेंटरी परीक्षेचा निकाल ९९.४०% तर इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९८.४२%

वैभववाडी (प्रतिनिधी) : कला संचालनालय मुंबई यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल काल जाहीर झाले. या परीक्षेत केंद्र क्रमांक ११५०१४ अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेस १६६ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सदरचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एलिमेंटरी परीक्षेचा केंद्राचा निकाल १००% लागला यापैकी एलिमेंटरी परीक्षेस २३ विद्यार्थी अ श्रेणीत, ३१ विद्यार्थी ब श्रेणीत तर १११ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर इंटरमिजिएट परीक्षेस १९० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १९७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन केंद्राचा इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल ९८.४० % लागला आहे. यापैकी इंटरमिजिएट परीक्षेस १८ विद्यार्थी अ श्रेणीत, १९ विद्यार्थी ब श्रेणीत तर १५० विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

अर्जुन रावराणे विद्यालयातून एलिमेंटरी परीक्षेस १७ विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेस २१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल १००% टक्के लागला आहे. यापैकी एलिमेंटरी परीक्षेत ४ विद्यार्थी अ श्रेणीत, ५ विद्यार्थी ब श्रेणीत तर ८ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर इंटरमिजिएट परीक्षेत १० विद्यार्थी अ श्रेणीत, ६ विद्यार्थी ब श्रेणीत तर ५ विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रशालेच्या आकांक्षा खाडे, अन्सार अत्तार, ब्रिजेश तुळसणकर, दुर्वाक्षी फाटक, ओम कोलते, परी नेवरेकर, सिद्धेश भंडारी, उत्कर्षा जाधव, वैष्णवी हावळ, वैष्णवी चव्हाण, वैदेही कडू, मानसी राठोड, राजनंदिनी हुदले, वीर सुतार या विद्यार्थ्यांनी अ श्रेणी प्राप्त केली आहे. परिक्षेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक मंदार चोरगे यांनी मार्गदर्शन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक बी.एस नादकर व संस्थेचे सर्व संचालक तसेच प्रशालेचे सर्व शिक्षक, क्षेत्र कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!