जनक्षोभ पाहता बैठकच अनधिकृत ठरवून डेप्यु.इंजि.प्रभू यांची माहिती देण्यास नकार !

उतारपेठ फोंडाघाट मधील महत्त्वाचे ब्रिज १५ जानेवारीला उध्वस्त होणार नाहीत

पर्यायी वाहतूक व्यवस्था झाल्याशिवाय ब्रिज पाडू नयेत— ग्रामस्थांचा उद्रेक

ग्रामपंचायत आणि लगतच्यांना विश्वासात न घेतल्याचा, शासन आणि ठेकेदार यांच्या प्रवृत्तीचा निषेध !

गावाचा विकास नक्की हवा, मात्र फोंडाघाटवासियांना अंधारात ठेवून नको— आग्रही मागणी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सरपंच ग्रामपंचायत, फोंडाघाट यांनी मेसेज टाकून ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, लगतचे कब्जेदार आणि सुजाण नागरिकांची तातडीची बैठक लावून, गावातील दोन ब्रिटिशकालीन ब्रिज पुनर्बांधणी करताना पर्यायी मार्गाची व्यवस्था संदर्भात, ठेकेदारांचे मॅनेजर प्रदीप मेस्त्री यांचे समवेत बांधकाम विभागाचे डेप्यु. इंजि. प्रभूमॅडम व ज्युनि. इंजिनियर प्रशांत खेडेकर यांचे उपस्थितीत तातडीची बैठक ग्रामपंचायत फोंडा येथे झाली…

यावेळी सरपंच संजना आग्रे उपसरपंच तनवी मोदी, जयेश भोगले , मिथिल पटेल, सुभाष सावंत,मिलिंद लाड, पवन भालेकर, प्रज्ञा शिंदे इत्यादी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित ग्रामस्थांनी, अधिकारी आणि ठेकेदार यांनी फोंडाघाट ग्रामपंचायतला तसेच ग्रामस्थ आणि व्यावसायिक यांना अंधारात ठेवून जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्याचा, तीव्र निषेध केला. आणि धारेवर धरले. त्यावेळी डेप्युटी इंजि. प्रभू यांनी सर्व बाबी तपासून लोकांना माहिती देणारे फलक लावून नंतरच, ब्रिजच्या कामाला सुरुवात होईल अशी प्रोसिजर सविस्तर सांगितली. ठेकेदार प्रतिनिधी महेश मेस्त्री प्रदीप पांचाळ यांनी सारवासारव करताना, लगतचे शितोळे व नांचे यांच्याशी बोलणी केल्याचे सांगितले. मात्र ग्रामपंचायतला का सांगितले नाही ? यावर ते अनुत्तरीत झाले …

याच ठेकेदाराने गेल्या दोन वर्षात कोंडाघाट मध्ये केलेली कामे अर्धवट ठेवली आहेत. आणि डंपर परत पाठवले– ह्या क्षुल्लक कारणाचा इगो पुढे करून पळ काढला आहे. त्याचा त्रास अजूनही फोंडा ग्रामस्थ भोगत आहेत. हेही निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ब्रिज पुनर्बांधणी काम ह्या ठेकेदाराकडून वेळेत पूर्ण होणार नाही ? असा ठाम विश्वास यावेळी संतप्त ग्रामस्थांनी उदाहरणासहित पटवून दिला. जर दिलेल्या वेळेत काम ठेकेदाराकडून पूर्ण झाले नाही, तर त्यास बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असे स्पष्ट शब्दात सुनावले .यावर प्रभू मॅडम निरुत्तर झाल्य ज्युनि.इंजिनियर खेडेकर तर बोलू शकले नाहीत.त्यामुळे पर्यायी वाहतुकीचा मार्ग सुरू झाल्याशिवाय ब्रिज पाडू नये. गावाचा विकास नक्कीच हवा, मात्र फोंडाघाटवासियांना अंधारात ठेवून नको. ब्रिजच्या नूतनीकरणास कुणाचाच विरोध नाही असे ग्रामस्थांनी सुनावले….

यावेळी झालेल्या खडाजंगी चर्चेत सुभाष सावंत, राजन चिके, अबू पटेल, भाई हळदीवे, अनंत पिळणकर सुजाता हळदिवे- राणे,निलेश भोगले, राजन नानचे ,रंजन चिके यांनी पर्यायी वाहतूक, ग्रामपंचायतीस विश्वासात घेणे, सरपंच यांचेकडून अनधिकृत बैठकीचे आयोजन, ठेकेदारांचा मस्तवाल इगो यावर घणाघाती हल्ला केला. अखेर डेप्यु. इंजि.प्रभू यांनी ही बैठक अनधिकृत ठरवून अधिक माहिती देण्यास नकार दिला. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते….

error: Content is protected !!