कणकवली शहरात मटका जुगार ऑनलाइन कसिनोसह अवैध धंदे तेजीत

कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा अण्णा कोदे यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात अवैध रित्या चालू असलेल्या मटका, जुगार, आऑनलाईन कॅशिनो, गुटखा, गोवा बनावटीची दारु विक्री व गांज्या-चरस असे अनेक अवैध धंदे सुरु आहेत. अवैध धंदे राजरोसपणे चालू असल्याने तरुण पिढी बरबाद होत आहे. कणकवली शहरात चालू असलेल्या अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी कणकवली पोलीस निरिक्षकांकडे भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केली. अन्यथा भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

अवैध धंद्याबाबत पोलीसांना वेळोवेळी माहिती देण्यात आलेली आहे. तरीपण आपणाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. या धंद्यामुळे काही कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. तसेच यामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन बरबाद होत चालली आहे. तरी याची गंभीर दखल घेऊन हे धंदे ताबडतोब कायमस्वरुपी बंद करावेत. अन्यथा कणकवली शहर भाजपच्या वतीने आम्ही आंदोलन छेडणार असल्याचा इशारा अण्णा कोदे यांनी दिला आहे.

error: Content is protected !!