कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे – तळेखोलवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव २०२६ चा प्रथम वर्धापन दिन गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे.
माघ शुद्ध चतुर्थी (विनायक चतुर्थी) निमित्त श्री माघी गणेश जयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून या कार्यक्रमाचे आयोजन ॐकार प्रासादिक मंडळ, तरंदळे – तळेखोलवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता महाअभिषेक, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाआरती होणार असून दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २.३० वाजता हळदी-कुंकू कार्यक्रमही होणार आहे.
संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत स्थानिक व निमंत्रित भजन मंडळांची भजने सादर केली जाणार आहेत. सायंकाळी ६ वाजता दत्तगुरु प्रासादिक भजन मंडळ, वैभववाडी (बुवा विकास नर) तर सायं. ७ वाजता लिंग पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ, सातरल खालचीवाडी (बुवा कु. लावण्या राणे) यांचे भजन होणार आहे.रात्री ९.३० वाजता खास आकर्षण म्हणून ‘आई भगवती कला दिंडी भजन’, तोरसोळे यांचा भक्तीरसपूर्ण कार्यक्रम सादर होणार आहे.
या निमित्ताने सर्व भाविक-भक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक ॐकार प्रासादिक मंडळ तरंदळे तळेखाेलवाडी यांनी केले आहे.











