कणकवली (प्रतिनिधी) : श्री कुंडेदेव देवालय गावडे समाज मित्रमंडळ तरंदळे–कुंदेवाडी यांच्या वतीने तरंदळे गाव मर्यादित भव्य ओव्हर आर्म TPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार २४ व रविवार २५ जानेवारी रोजी पार पडणार आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शनिवार, २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तर बक्षीस वितरण समारंभ रविवार, २५ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.ही क्रिकेट स्पर्धा तरंदळे कुंदेवाडी माळ, अलंकार हॉलच्या बाजूला आयोजित करण्यात येणार असून, तरंदळे गावातील युवक खेळाडूंना आपली क्रीडा कौशल्ये दाखविण्याची संधी मिळणार आहे.
तरी सर्व क्रिकेटप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री कुंडेदेव देवालय गावडे समाज मित्रमंडळ तरंदळे–कुंदेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.












