फोंडाघाट जि. प.मतदारसंघातून धनुष्यबाण निशाणीवर लढवणार निवडणूक
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात इच्छुक असलेले बबन उर्फ मामा हळदीवे यांचा शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश घेण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये हळदिवे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पुन्हा फाेंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघाची उमेदवारी शिंदे शिवसेनेकडे जाणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून, यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, महेश कांदळकर, शरद वायंगणकर सत्यवान राणे आदी उपस्थित होते.
Share this:












