शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर जयंती उत्साहात साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचालित शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण,येथे स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांची जयंती प्रशालेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर व त्यांच्या पत्नी यांच्या प्रमुख उपस्थित उस्ताहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख अतिथी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या हस्ते गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई,योगेश गोडवे प्रशांत गुळेकर, खारेपाटण सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ ए.डी. कांबळे,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सानप पर्यवेक्षक संतोष राऊत व शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.या सर्वांच्या वतीने गुरुवर्य पेंढारकर सरांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी प्रमुखं अतिथी श्रीकृष्ण पाटणकर यांनी आपल्या भाषणातून गुरुवर्य पेंढारकर सर यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्कारक्षम कार्यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे असून आजच्या पिढीसाठी ते प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.तर गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या जयंती चे औचित्य साधून सिनिअर कॉलेज विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपार सत्रामध्ये प्रशालेतील प्राथमिक विभागातील मुलांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!