आखवणे येथे 27 ते 30 जानेवारी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

नामस्मरणाच्या उत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री धाकुबाई देवी प्रा. वारकरी संप्रदाय भजन मंडळ मुंबई आणि आखवणे वरचीवाडी मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक 27 जानेवारी ते शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किंजळीचा माळ येथे करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज सकाळी 5 ते 6 वाजता काकड आरती, सकाळी 10 ते 12 वाजता वारकरी भजन, सायंकाळी 5.30 वा. ते 6.30 वा. प्रवचन, सायंकाळी 7 ते 8 वाजता हरिपाठ व रात्री 9 ते 11 कीर्तन व रात्री 11 नंतर जागर असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

यानिमित्त ह. भ. प. नम्रताताई हनुमान महाराज मोरे (खेड), ह. भ. प. बाळकृष्ण महाराज दळवी (अहमदनगर), ह. भ. प. स्वाध्वी वैष्णवी दीदी सरस्वती महाराज (आळंदी), ह. भ. प. अनंत महाराज मोरे (मौदे) यांची सुश्राव्य कीर्तन होणार आहेत. तर ह. भ. प. सदानंद महाराज पांचाळ (मुंबई), रमेश महाराज मोरे (खेड), ह. भ. प. सुनील महाराज साळवे (डोंबिवली) यांची सुश्राव्य प्रवचने होणार आहेत.

या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, माजी सभापती नासीर काझी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मानाजी घाग, सचिव शैलेंद्र पडवळ यांनी केले आहे.

error: Content is protected !!