शिवसेना नेते संजय आंग्रे व भाजप तालुका प्रमुख दिलीप तळेकर यांची उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषदचे उमेदवार प्राची देवानंद ईसवलकर व खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार गुरुप्रसाद दीपक शिंदे आणि तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव या भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व उमेदवारांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ मंदिर खारेपाटण श्री देव कालभैरव मंदिर खारेपाटण येथून करण्यात आला.

यावेळी शिवसेना (शिंदे) पक्षाचे उपनेते संजय आंग्रे, कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव, भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर, भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर, माजी पं. स. सदस्य तृप्ती माळवदे, खारेपाटण उपसरपंच महेंद्र गुरव, माजी सरपंच किशोर माळवदे, उपसरपंच इस्माईल मुकादम, लियाकत काझी, खारेपाटण ग्रा. पं. सदस्य सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, जयदीप देसाई, मनाली होणाळे, शीतीजा धुमाळे, धनश्री ढेकणे, अस्ताली पवार, भाजप महिला कार्यकर्त्या उज्ज्वला चिके, निशा गुरव, आरती गाठे, भाजप कार्यकर्ते एकनाथ कोकाटे, पप्पू ब्रम्हदंडे, प्रवीण लोकरे,श्री. कुबल, रामा पांचाळ, अरुण कर्ले, मंगेश कांबळे, प्रणय गुरसाळे, राजेंद्र वरूणकर, शेखर शिंदे, अशोक पाटील, डॉ. येळकोटे याबरोबर शिवसेना शिंदे पक्षाचे शरद वायंगणकर, मंगेश ब्रम्हदंडे, चिन्मय शिंदे, सुहास राऊत, गौरी शिंदे आदी दोन्ही पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या वतीने खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाने प्रचाराचा शुभारंभ करून विरोधी पक्षांना एक प्रकारे चपराक दिली असल्याचे बोलले जात असून भाजप व शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.












