मांजलकरवाडी लोरे नं. २ येथे भव्य रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री दत्त सेवा ग्रामस्थ मंडळ मांजलकरवाडी लोरे नं. २ या मंडळाच्या वतीने भव्य रस्सीखेच स्पर्धा गुरवार दिनांक २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्राथमिक शाळा विद्यामंदिर मांजलकरवाडी शाळा पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना प्रथम क्र. ५ हजार रुपये, द्वितीय क्र. ३ हजार, तृतीय क्र. २ हजार, तर उत्तजनार्थ १ हजार रुपये व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. इच्छुक संघाने 26 जानेवारी पर्यंत मंडळाशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने घनश्याम नावळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!