अपघातात चालक जखमी : डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान
कणकवली (प्रतिनिधी) : नरडवेहुन कणकवलीच्या दिशेने जाणारा डंपर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने शिरवल फणस येथील वळणावर पलटी होऊन अपघात घडला. हा अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. अपघातात चालक जखमी झाला असून डंपरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.चालक केबीनची काच फोडून बाहेर आल्याचे समजते.डंपर चालकाला उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे उपचारासाठी दाखल केले आहे.शिवडाव येथील क्रशर वरुन धुतलेली वाळू भरुन कणकवली कडे जात असताना हा अपघात झाला.सुदैवाने याच दरम्यान कुठलेही वाहन आले नसल्याने मोठा अनर्थ टळला.










