कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेची 30 एप्रिल रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा

75 वर्ष वयावरील सभासदांचा होणार सत्कार

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेवेळी 75 वर्षे वयावरील सभासदांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी महेंद्र मुरकर मोबा. 9112772373 आणि दादा कुडतरकर मोबा.9422379090 यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अन्य विषयांसह पुढील 3 वर्षांसाठी नूतन तालुका कार्यकारिणी ची निवडही करण्यात येणार आहे. सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर, सचिव महेंद्र मुरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!