खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात तिरंगी लढत

महायुतीचे उमेदवार गुरू शिंदे आणि अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांच्यात होणार चुरस

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात यंदा तिरंगी लढत होणार असून भाजप शिवसेना शिंदे व आर पी आय महायुतीचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व शिवसेना (उबाठा) पक्षाचे बाळा राऊत अपक्ष उमेदवार रफिक नाईक हे उमेदवार निवडणुकीत आपले नशीब अजमावताना दिसत आहे.त्यामुळे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात खरी लढत ही महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे आणि अपक्ष उमेदवार रफीक नाईक यांच्यात होणार हे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ याआधीच सुरू करण्यात आला असून भाजप पक्षाच्या उमेदवार व खारेपाटण विद्यमान सरपंच सौ प्राची ईसवलकर या मतदार संघातून बिनविरोध निवडून आल्यामुळे महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.त्यामुळे पंचायत समिती मतदार संघात देखील महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे हे निवडून येतील असा विश्वास शिवसेना शिंदे पक्षाचे कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव व भाजप पक्षाचे तालुका प्रमुख दिलीप तळेकर यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात निवडणुकी साठी उभे असलेले शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार बाळा राऊत यांचा फारसा प्रभाव मतदार संघात नसल्यामुळे खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य असलेले युवा उद्योजक शिवसेना शिंदे पक्षाचे गुरुप्रसाद शिंदे यांनी घर टू घर मतदारांची भेट घेत आपल्या प्रचाराला धडाकेबाज सुरवात करत प्रचारात आघाडी घेतली आहे.तर अपक्ष उमेदवार युवा उद्योजक खारेपाटण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रफिक नाईक यांनी देखील एक हाती किल्ला लढवत मतदारांच्या वन टू वन भेट घेत प्रचाराला सुरवात केली आहे.त्यामुळे खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात जरी तिरंगी लढत होणार असली तरी खरी लढत ही गुरुप्रसाद शिंदे व रफिक नाईक यांच्यात होणार असल्याचे मतदारांकडून बोलले जात आहे..

error: Content is protected !!