माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेची विद्यार्थिनी कु.तन्वी हर्णे हिचे NMMS परीक्षेत सुयश

कणकवली (प्रतिनिधी): माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिकणारी कु.तन्वी प्रसाद हर्णे या विद्यार्थिनीने शै.वर्ष २०२२-२३ NMMS या परीक्षेमध्ये उत्तुंग असे यश संपादन केले आहे.तसेच तिची विशेष मागास प्रवर्गातून शिष्यवृत्ती साठी निवड झालेली आहे.कु.तन्वी हर्णे हिला प्रशालेचे विज्ञान शिक्षक कसालकर सर, भानुसे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हिच्या या यशाबद्दल कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश सावंत तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शालेय समिती चेअरमन सन्मा. आर्.एच.सावंत सर तसेच सर्व सदस्य,प्रशालेचे मुख्याध्यापक/ प्राचार्य एस.डी.दळवी,पर्यवेक्षक,शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी हिचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!