आचरा जि. प. उमेदवार वर्षा सांबारी व चिंदर पं. स. उमेदवार दिपक सुर्वे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

आचरा (प्रतिनिधी) : आचरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना उमेदवार वर्षा मांगरीश सांबारी व चिंदर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिपक भागोजी सुर्वे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा महायुतीच्या वतीने चिंदर भगवती माऊली मंदिर येथून भगवती माऊलीला साकडे घालून करण्यात आले. त्यानंतर श्री देव रामेश्वर चिंदर, श्री जयंती देवी पळसंब, श्री गणेश मंदिर कोईळ, श्री पावणाई देवी बांदिवडे, श्री देव रामेश्वर त्रिंबक, श्री ब्राह्मण देव, श्री सातेरी देवी, श्री पावणाई देवी त्रिंबक या ग्रामदेवता सहित, उमेदवार, कार्यकर्ते, नेते यांनी आशिर्वाद घेतला.

यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश राणे, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, शिवसेना तालुका चिटणीस चंद्रकांत गोलतकर, विभाग प्रमुख संतोष कोदे, प्रकाश मेस्त्री, देवेंद्र हडकर, किशोर त्रिंबककर, अशोक बागवे, जेरोन फर्नांडिस, संतोष मिराशी, बाबू परुळेकर, दक्षता सुर्वे, शेखर सुतार, एकनाथ घाडी, संतोष गांवकर, संतोष अपराज, रवि घागरे, दिलीप कावले, मांगरीश सांबारी, प्रफुल्ल प्रभू, सागर अपराज, दिगंबर जाधव, दत्ता वराडकर, भाऊ हडकर, शेखर पालकर, शिशिर पालकर, पुरुषोत्तम परब, राजु त्रिंबककर, दिपक सावंत, अमोल साटम, शाहुलखन बांदिवडेकर, सचिन हडकर,सागर परुळेकर, बाळू माळकर, दिगंबर जाधव, महिला वर्ग आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!