खारेपाटण येथे उद्या आमदार नीलेश राणे यांची गुरुप्रसाद शिंदेंसाठी भव्य प्रचार रॅली

आ.निलेश राणेंची प्रचार रॅली ठरणार मास्टर स्ट्रोक

खारेपाटण (प्रतिनिधी) : पंचायत समितीचे भाजप शिवसेना महायुतीचे शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार गुरुप्रसाद शिंदे यांच्या प्रचारार्थ कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार नीलेश राणे हे उद्या गुरुवार ५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता खारेपाटण बाजारपेठ येथे भव्य प्रचार रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश गुरव यांनी दिली.

खारेपाटण बाजारपेठेत उद्या होणाऱ्या प्रचार रॅलीत महायुतीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार असून आमदार नीलेश राणे यांसह शिवसेना उपनेते संजय आग्रे शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरद वायंगणकर भाजप कणकवली तालुका प्रमुख दिलीप तळेकर,माजी जि.प.सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार,भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत, खारेपाटण सरपंच व खारेपाटण जि.प. बिनविरोध निवडून आलेल्या भाजप सदस्य सौ प्राची ईसवलकर, खारेपाटण पंचायत समितीचे उमेदवार श्री गुरुप्रसाद शिंदे,तळेरे पंचायत समितीचे उमेदवार राजेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

error: Content is protected !!