फोंडयात गुंजतोय अनंत पिळणकरांचा नारा

विरोधकांना जनताच देणार नाही थारा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात आता वारे फिरले असून संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी निशाणीची धून वाजू लागली आहे. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोरे पंचायत समिती मधील लोरे, वाघेरी या गावात फोंडा जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार अनंत पिळणकर व लोरे पंचायत समितीचे उमेदवार कीर्ती एकावडे यांनी प्रचाराचा धुरळा उडवला. नवीन कुर्ली गावात होमपीचवर अनंत पिळणकर यांनी घरोघरी जाऊन प्रचाराचा धडाका उडवला. आपल्या गावाचा उमेदवार म्हणून अनंत पिळणकर यांचे घरात ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. आमच्या गावातील आमच्या घरचा उमेदवार म्हणून अनंत पिळणकर यांनाच आमची पसंती असल्याची प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली. अनंत पिळणकर यांनी आपल्या दमदार प्रचाराने फोंडाघाट मतदारसंघात असलेले विरोधकांचे एकतर्फी वातावरण पूर्ण फिरवले असून झेड. पी. निवडणुकीत मोठी चुरस निर्माण केली आहे. अनंत पिळणकर याना संपूर्ण मतदारसंघात मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. पिळणकर यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुंदर पारकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख सिद्धेश राणे, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे रमेश राणे, लोरे शाखाप्रमुख निलेश राणे, घोणसरी माजी सरपंच कृष्णा एकावडे, घोणसरी ग्रामपंचायत सदस्य सचिन मेस्त्री, विशाल राणे, प्रीतम राणे, दर्षण मराठे, प्रशांत सुतार, वैभव तावडे आदी प्रचारात सहभागी झाले होते.

error: Content is protected !!