खारेपाटण गट वि. का. सेवा सोसायटीमध्ये कै. कांता आप्पा शेट्ये यांचा प्रथम स्मृतीदिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष कै. सूर्यकांत शंकर शेट्ये उर्फ कांता आप्पा शेट्ये यांचा प्रथम स्मृती दीन कार्यक्रम बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी सोसायटीच्या कार्यालयात संस्थेचे विद्यमान चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी खारेपाटण सोसायटीचे संचालक सुरेंद्र कोरगावकर, विजय देसाई, इस्माईल मुकादम, भाऊ राणे, श्रीधर गुरव, कार्यालक्षी संचालक व संस्थेचे सचिव अतुल कर्ले,संस्थेचे लिपिक श्री मांजरेकर, मापारी अमित पाटणकर आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेच्या कार्यालयात लावण्यात आलेल्या कै. सूर्यकांत उर्फ कांता आप्पा शेट्ये यांच्या प्रतिमेला संस्थेचे अध्यक्ष रवींद्र उर्फ बाळा जठार व संस्थेचे संचालक सुरेंद्र कोरगावकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यानंतर संस्थेच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

error: Content is protected !!