आडवली मध्ये शिवजयंती उत्सवानिमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा…!

आचरा (प्रतिनिधी) : आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्रौ ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/ संतकालीन/ पेशवेकालीन व्यक्तिरेखा-प्रसंग सादरीकरण हा आहे. विजेत्या पहिल्या 5 स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदनी आवश्यक असून स्पर्धेची नियमावली व नोंदणीसाठी मिलिंद चव्हाण- 9403229230/ 9322191369 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!