सर्वाधिक ६५.५४ % मतदान खारेपाटण केंद्रशाला नं. १ या केंद्रावर
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत खारेपाटण पंचायत समिती गणातील खारेपाटण या गावातील एकूण ६ मतदान केंद्रावर सुमारे ३२४४ मतदार पैकी एकूण १८९६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये एकूण ९६५ स्त्रिया व ९३१ पुरुष मतदारांनी मतदान केले. तर सुमारे ५८.४४ % टक्के एवढे मतदान झाले. तर सर्वाधिक मतदान ४/१३ या केंद्रावर खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ येथे ६५.५४ % टक्के एवढे मतदान झाले. तसेच कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतता पूर्ण वातावरणात सर्व मतदान खारेपाटण मध्ये पार पडले.
खारेपाटण जिल्हा परिषद निवडणूक ही बिनविरोध झाल्यामुळे फक्त खारेपाटण पंचायत समिती करीता आज मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघात तिरंगी लढत होत असून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद दीपक शिंदे व अपक्ष उमेदवार रफिक उस्मान नाईक तर शिवसेना उबाठा पक्षाचे रामचंद्र अनंत राऊत हे उमेदवार निवडणूक रिंगणात उंभे असून खरी लढत ही महायुतीचे उमेदवार गुरुप्रसाद शिंदे व अपक्ष उमेदवार रफिक नाईक यांच्यात होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
खारेपाटण येथे आज ६ मतदान केंद्रावर झालेले मतदान पुढील प्रमाणे :-
खारेपाटण हायस्कूल ४/१० (राऊत वाडी, गुरववाडी, कर्लेवाडी, पंचशील नगर, कोष्टेआळी)
एकूण मतदान – ५७७
झालेले मतदान – एकूण ३४० (५८.९२ %)
खारेपाटण हायस्कूल ४/११ (रामेश्वर नगर, राऊतवाडी)
एकूण मतदान – ६११
झालेले मतदान – ३३० (५४.००%)
खरेपाटण हायस्कूल ४/१२ (संभाजी नगर, गुरववाडी, हसोलटेंब कोंडवाडी)
एकूण मतदान – ४९०
झाजेले मतदान – २९५ (६०.२० %)
खारेपाटण जि. प. केंद्र शाळा नं. १ शिवाजीपेठ ४/१३ (शिवाजीपेठ,जैनवठार,कालभैरव वाडी,कपिलेश्वरवाडी)
एकूण मतदान – ५५५
झालेले मतदान – ३६३ (६५.५४ %)
खारेपाटण उर्दू शाळा बंदरगाव शिवाजीपेठ ४/१४ (बांद्रवाडी, सम्यक नगर)
एकूण मतदान – ५३०
झालेले मतदान – २७९ (५२.६४ %)
खारेपाटण काजिर्डे उर्दू शाळा ४/१५ (काझीवाडी, टाकेवडी संभाजीनगर)
एकूण मतदान – ४८१
झालेले मतदान – २८९ (६०.०८ %)
दरम्यान खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात आज तिन्ही उमेदवारांचे भविष्य मतपेटीत सील झाले असून ९ फेब्रुवारी मतमोजणी दिवशी गुलाल नेमका कोणाचा उधळणार ? यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागेल. तरी खारेपाटण येथील मतदान प्रकिया ६ मतदान केंद्रावर झोनल ऑफिसर मंगेश पवार यांच्या देखरेखी खाली शांततेत पार पडले.












