रात्री 9 ते 12 पर्यंत दर्शन रांग धार्मिक विधिसाठी बंद, भाविक हाच केंद्र बिंदू
मालवण (प्रतिनिधी) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव 9 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे देवीच्या दर्शनाची आस घेऊन आंगणेवाडीत दाखल होणारा भाविक हा केंद्रबिंदू मानूनच या भाविकांना देवीचे दर्शन वीना विलंब मिळावे असे नियोजन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांनी प्रशासनाच्या मदतीने केले आहे.जत्रोत्सवा दीवशी 9 फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता भाविकांची दर्शन रांग सुरू होणार असून त्याच दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर रात्री नऊ ते बारा धार्मिक विधींसाठी भाविकांचे दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. उतररात्री 1 नंतर पुन्हा दर्शन दर्शन रांग सुरू होणार आहे. 10 फेब्रुवारी मोड जत्रे दिवशी सायंकाळी 7 वाजे पर्यंत भाविकांना देवीचे दर्शन होणार आहे अशी माहिती आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे यांनी आंगणेवाडी येथे दिली.
जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन श्री भराडी देवी मंदिराच्या प्रांगणात शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे सचिव काका आंगणे, कार्याध्यक्ष बाळा आंगणे, बाबू आंगणे आदी उपस्थित होते. जत्रोत्सव उत्साहात संपन्न होण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे. गतवर्षी नियोजनात राहिलेल्या त्रुटी दूर करून काही बदल यावर्षी करण्यात आले आहेत. भविकांना एकूण नऊ दर्शन रांगांद्वारे दर्शन मिळणार आहे तसेच महनीय व्यक्तींसाठी वेगळी दर्शन रांग असणार आहे. यावर्षीचा जत्रोत्सव हा प्रशासनाच्या आवाहनानुसार प्लास्टिक मुक्त जत्रोत्सव असणार असून त्यादृष्टीने आम्ही सुद्धा नियोजन केलेले आहे.
राज्यात महानगरपालिका आणि नगरपालिका यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्याने विजयी नगरसेवक सुद्धा आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील विजय उमेदवार सुद्धा सोमवारी आई भराडीच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे त्यादृष्टीने सुद्धा नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती यावेळी बाबू आंगणे यांनी दिली.
आंगणे कुटुंबीय गेले 2 महिने मेहनत घेत आहेत. शासनाकडून फार मोठे सहकार्य मिळत आहे. पालकमंत्रि नितेश राणे यांनी सुद्धा नियोजन बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे काम पूर्ण होत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सुद्धा आपल्या विभागाना आवश्यक सूचना केल्या आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून नऊ टँकर उपलब्ध होणार आहेत. ग्रामपंचायत, वीज वितरण कडून रस्ता लाईट साठी 9 पोल नव्याने उभारण्यात आले आहेत. पार्किंग ठिकाणी अल्प शुल्कात वाहने पार्क करण्यात येतील. दुकान व्यवस्था सुद्धा प्रशासनाच्या मागणी नुसार केली आहे. व्यावसाईकांचे नुकसान होऊ नये यासाठी दखल घेण्यात आली आहे. रिक्षा व्यवसाईक यांचा सुद्धा व्यवसाय व्हावा यासाठी स्टॅन्डचे नियोजन केलेले आहे. अपंगां साठी कणकवली मालवण दिशेने वाहतुकीसाठी वाहन असणार आहे. स्वयंसेवक सुद्धा सोबत असणार आहेत. सर्व सामान्य भाविकाला अर्ध्या तासात दर्शन मिळेल असे नियोजन आहे. मुख दर्शन साठी वेगळी लाईन मधून पाच मिनिटात दर्शन होणार होणार आहे. ग्रामस्थांचे पाचशे स्वयंसेवक तर पंढरपूर मधील शंभर स्वयंसेवक भाविकांना सेवा देणार आहेत. भाविकांनी सर्व सूचनांचे पालन करून जत्रोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन यावेळी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी आणि आंगणेवाडी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले.












