रेडी जि. प. चे प्रीतेश राऊळ व रेडी प. स. च्या प्रीयांका घाटवळ यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि. प. चे विजयी उमेदवार प्रीतेश राऊळ व रेडी पं.स.च्या विजयी उमेदवार प्रीयांका घाटवळ यांचा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जि. का. का. सदस्य व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा मा.सरपंच मनोज उगवेकर उपस्थित होते.

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जि.प मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. प्रीतेश राऊळ यांनी सलग दुसर्‍या वेळी या मतदार संघातुन विजय मिळवला. तसेच त्यांनी मागच्या टर्म मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून चांगली कामगीरी बजावली, त्यामुळेच मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा मोठ्ठ्या मताधिक्यांने निवडुन दिले.

तसेच रेडी पंचायत समीती मतदार संघातुन नवख्या असलेल्या प्रियांका घाटवळ ह्या संघटनेच्या ताकदीवर निवडुन आल्या. त्यांना पण स्थानिक केरवाडा ग्रामस्थांची साथ लाभली. ह्या दोन्हीही विजयी उमेदवारांचा सत्कार रेडी व शिरोडा – केरवाडा येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात आला. यावेळी नितीन तारी, पांडुरंग घाटवळ, शंकर घाटवळ, गोपाळ बटा, नारायण मोरजे उपस्थित होते.

error: Content is protected !!