आचरा येथे उद्या भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

आचरा (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून व सहकार्याने भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उद्या १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर किल्ला लॉज जवळ (आचरा-मालवण रोड) आचरा तिठा नजीक शिबीर संपन्न होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते होणार आहे. शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया तसेच गरजूंना मोफत चष्मे वाटप शिबिर केले जाणार आहे. शिबिराचे आयोजन आचरा जि. प. सदस्य वर्षा सांबारी, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर यांनी केले आहे. शिबीराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!