सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी: मंत्री नितेश राणे

जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.

या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर सचिव तानाजी पवार, कृषी विभागाचे चंदन शिवे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव सोमनाथ बागुल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे दीपक केंद्रे, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव ठाकूर, जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, जलसंधारण विभागाचे सहसचिव संदीप जाधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा जिल्हा आहे. तसेच राज्यातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख मिळाली असून, नीती आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्गमधील विविध आस्थापनांवरील वरिष्ठ व आवश्यक पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

error: Content is protected !!