मडूरेत उद्या छत्रपती शिवप्रेमी ग्रुपतर्फे शिवजयंती सोहळा

खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील छत्रपती शिवप्रेमी व्हाट्सअँप ग्रुपतर्फे गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संध्याकाळी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल.

सकाळी ९ वाजता छत्रपतींच्या मूर्तीची भव्य मिरवणूक होईल. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा, शिवपूजन व दीप पूजन होईल. सायंकाळी ६ वाजता महिलांची फुगडी होईल. ७ वाजता भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. यासाठी प्रथम पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये व चषक आणि द्वितीय ३ हजार ३३३ रुपये व चषक ठेवण्यात आले आहेत.

सदर स्पर्धा श्री माऊली मंदिर रंगमंचावर संपन्न होईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रवीण उर्फ पिंटो परब (९४०४७५९२१६) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!