सावंतवाडी येथे मुलांसाठी 5 दिवसीय फिटनेस किड्स शिबीराचे उदघाटन

बांदा (प्रतिनिधी) : ब्लेसिंग इंटरनॅशनल स्कूल भटवाडी सावंतवाडी येथे फिटनेस किड्स अकॅडमी, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत मंगळवार दि 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता फिटनेस किड्स शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या शिबिराला उद्घाटक म्हणून स्कूल चे प्रिंसिपल नितेश पिंगे हे लाभले आणि अध्यक्ष म्हणून राष्ट्र सेवा पुरस्कार प्राप्त योगशिक्षक शेखर बांदेकर हे लाभले.

त्यावेळी फिटनेस योग चे फाउंडर मेंबर रवींद्र प्रभू देसाई, अनिल मेस्त्री, नारायण सावंत आणि रसिका सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. दिप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाल्यानंतर योगशिक्षक शेखर बांदेकर यांनी योगाभ्यास घेतला. सूर्यनमस्कार, योगासने, सुक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम असा योगाभ्यास घेण्यात आला तसेच मुलांचा कठीण आसनांचा सराव देखील घेण्यात आला. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक तसेच स्कूल च्या शिक्षकांनी देखील सदर योगवर्गाचा लाभ घेतला. सदर शिबिर हे स्कूल मध्ये 5 दिवासाकरिता चालू ठेवल्यामुळे पालकांमध्ये उत्साह वाढिस लागला.

योगाभ्यासासोबत हेल्दी फूड चे महत्व देखील मुलांना सांगण्यात आले. नियमितपणे योगाभ्यास केल्याने आपण रोगमुक्त होतो त्यामुळे प्रत्येकाने योगाभ्यास करणे आवश्यक आहे. असे स्कूल चे प्रिंसिपल श्री पिंगे यांनी सांगितले.

error: Content is protected !!